
चिमुकल्यांच्या राख्या निघाल्या सीमेवरती
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस शहरातील वाघमोडे कुटुंब आणि टेळे कुटुंब यांच्या संयुक्त विद्यमाने चिमुकल्यानी हाताने राख्या बनवून सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्याचे काम हाती घेतले. या राख्या पाठवण्याच्या सोहळ्याचे उद्घाटन अहिल्यादेवी मेडिकल अँड बुक स्टॉल व टेळे परिवाराच्या वतीने माळशिरस येथे तहसिलदार जगदीश निंबाळकर ,नायब तहसिलदार नामदेव काळे,नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ . विश्वनाथ वडजे,माजी सैनिक मारुती वाघमोडे यांच्या हस्ते संपन्न झाले .
यावेळी तहसीलदार निंबाळकर व मुख्याधिकारी वडजे यांनी आपले मनोगत व्यक्त करून चिमुकल्यांना आशीर्वाद दिले.
“जीवन नात्याचे असते, पण नाती टिकवताना खरे मोल मनाचे असते”या शब्दाची खरी प्रचिती अहिल्या,तृप्ती,संयोगीता,भार्गवी,यशवंती,हार्दिक तानाजी वाघमोडे तसेच भार्गवी सुरेश टेळे या चिमुकल्यांच्या हाताने करून दाखवली आहे.
आज आपण ज्या जवानांमुळे निवांतपणे, सुखरूपपणे जीवन जगतो त्या जवानांसाठी या चिमुकल्यांनी राख्या तयार करून एक पवित्र अतूट नाते आपल्या सैनिकासोबत निर्माण केले आहे.
“शब्द कोणते सांगावे कौतुकाचे,
त्यास शब्द सापडत नाहीत,
असे आमचे जवान,
त्यांना कधी कोणी हरवू शकत नाहीत”
या शब्दाप्रमाणे आपले जवान आहेत. वर्ष-वर्ष सैनिक आपल्या घरच्या माणसांपासून दूर असतात. बहिणीशी वर्ष वर्ष भेट होत नाही.त्यामुळे आपल्या बहिणीची आठवण येऊ नये व देशातील सर्व बहिणी आपल्या पाठीशी उभ्या आहेत, यासाठी सैनिकांना राख्या पाठवण्याचे काम केले आहे.
या कार्यक्रमाला केमिस्ट,पत्रकार तानाजी वाघमोडे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे , नितीन गायकवाड,मकरंद कुदळे,सचिन गाडेकर , पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष एल. डी वाघमोडे,पत्रकार संघाचे सचिव संजय हुलगे,बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील, तालुका पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस संजय देशमुख, सैनिक वैभव पालवे, मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, व्यापारी वाघमोडे,दोशी व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले.प्रास्ताविक शोभा वाघमोडे यांनी केले. आभार रेश्मा टेळे यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद