माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी रणजीत वलेकर

माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटनेची कार्यकारिणी जाहीर
रणजीत वलेकर एकमताने अध्यक्ष
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी वटफळी गावचे रणजीत वलेकर यांची बिनविरोध निवड झाली.
माळशिरस तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून ते कार्यरत आहेत.रणजीत वलेकर यांनी कृषी सहाय्यक पदावर काम करीत असताना शेतकरी व कृषी सहाय्यक यांचा समन्वय ठेवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी रणजीत वलेकर यांची नेहमी भूमिका सकारात्मक असते. कृषी विभागाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडत असतात. कृषी कार्यालयामध्ये नेहमी कृषी सहाय्यक यांना मोलाचे सहकार्य करत असतात. अडचणीच्या वेळी मदतीला धावून जात असतात. त्यांचे कार्यकर्तृत्व पाहून त्यांच्यावर सर्व कृषी सहाय्यक यांनी विश्वास टाकून तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. कृषी सहाय्यक यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अध्यक्षपदी निवड होताच रणजीत वलेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माळशिरस तालुका कृषि सहाय्यक संघटनाची कार्यकारणी:
अध्यक्ष -रणजित सुधाकर वलेकर
कोषाअध्यक्ष – दत्तात्रय जगन्नाथ पांढरमिसे उपाअध्यक्ष -सुभाष गणपत ढोबळे (पिलीव) ),
सचिन बाबु दिडके (नातेपुते ),
विजय बाळकृष्ण लोखंडे (माळशिरस),
दादासाहेब अर्जुन साळुंखे (अकलूज)
संघटक -मोहन मधुकर तोरणे
मार्गदर्शक- अर्जुन आण्णा वाघमोडे,
नितीन संभाजी शिंदे
सचिव भागवत पांडुरंग शिंदे ,
प्रसिद्धी प्रमुख – राजु शिवाजी हुलगे
महिला प्रतिनिधी- विदया अंकुश दोड