प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा: जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
कोयनेतून आज दुपारपर्यंत 50000 क्युसेस विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणी पातळी सध्याच्या पाणीपातळी पेक्षा दहा ते बारा फुटाने अधिक वाढू शकते . त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण सुरू करावे , असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयर्विन पूल येथे पाणीपातळी 50 ते 52 फुटापर्यंत वर जाऊ शकते याची नोंद घेऊन सखल भागातील नागरिकांनी, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, यासाठी प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरण
कोयना धरणामधून आज दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजता सांडव्यावरुन 9567 क्युसेक्स विसर्ग (2 फुट) व पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक्स असा एकूण 11667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत आला आहे.
सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक्स (5 फुट) इतका करणेत येणार आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन