भालचंद्र पाटील यांची पुण्यतिथी साजरी
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे कन्हेर येथील इमारतीच्या स्लॅबपूजन सोहळ्यास व भालचंद्र पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचे चुलत आजोबा कै.भालचंद्र पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी अभिवादन केले.
तसेच रमेशभाऊ पाटील यांच्या नवीन वास्तूच्या स्लॅबचे पूजन केले.
यावेळी बाळासाहेब सरगर ,शंकरराव देशमुख ,माणिकराव वाघमोडे , दादासाहेब हुलगे ,दादासाहेब वाघमोडे , विश्वास सिद ,इंद्रजीत रुपनवर व पाटील कुटुंबीयांसह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती