मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते स्व. मोहनराव(काका) भोसले यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त नेलकरंजी येथे समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले.
राजकीय,सामाजिक, सहकार, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान, गोरगरीबांना मदत देत स्व.मोहनकाकांनी केलेल्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला.
खानापूर-आटपाडी विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप (भैय्या) भोसले ,शरद भोसले ,पंचायत समिती सदस्या सारिका भिसे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष शशिकांत देठे,राहुल गायकवाड, आटपाडी तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष डी.एम.पाटील, नेलकरंजीचे सरपंच बाबासो भोसले, चेअरमन जालिंदर भोसले ,युवानेते किरण पवार,गणपत काटकर,सदाशिव ढगे, विठ्ठल ढोबळे, शिवाजी दबडे ,मोहन खरात ,उमर शेख, अशोक खरात,ग्रा.पं.सदस्य रुपेश गायकवाड, शंकर जगताप,सुरेंद्र कदम,अमोल माळी, हरी पवार, रावसाहेब मेटकरी, आबासाहेब साठे,माजी सरपंच मोहनराव भोसले, यांंच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन