सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेवर पुन्हा आटपाडीचा झेंडा!

यु.टी.जाधव पुन्हा चेअरमन ; राजाराम सावंत व्हा.चेअरमन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
शिक्षक बँकेच्या इतिहासात आटपाडीचे सर्वस्पर्शी व्यक्तीमत्व शैक्षणिक ,सामाजिक ,राजकिय क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे धडाडीचे शिक्षक नेते यु.टी.जाधव यांच्या गळ्यात पुन्हा शिक्षक बँकेच्या चेअरमन पदाची माळ पडली असून व्हा.चेअरमन पदी जतचे राजाराम सावंत यांची वर्णी लागली आहे.
या निवडीबद्दल आटपाडी येथे यु.टी.जाधव यांच्यावर प्रेम करणाऱ्या मित्रमंडळी,सामाजिक संघटनांनी फटाकांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. या निवडी हॉटेल लोटस सांगली येथे पार पडल्या. १४ विरुद्ध ७ मतांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड झाली.यावेळी उत्तम बालटे, बजरंग फडतरे, महादेव राऊत, संजय कबीर, शशिकांत सागर, चंदु काळे, सागर राऊत, दिपक बालटे, मनोज माळी, सचिन माळी, पिनू पंच, दिलीप माळी, भागवत माळी, अमित फडतरे,ग्रा.पं.सदस्य विजय माळी, सोमनाथ अडसूळ, सचिन सागर, माजी सरपंच रावसाहेब सागर, उपस्थित होते.