एक पद,एक झाड’ : माळशिरस पंचायत समितीत अनोखा उपक्रम

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून ‘एक पद,एक वृक्ष’ या मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती, माळशिरस येथे आज दि. २९ जून रोजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते पंचायत समिती परिसरात वृक्षारोपन करुन करण्यात आला.

दरम्यान पं.स.माळशिरस कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांची संख्या १०७ व पंचायत समिती सभापती, उपसभापती व सर्व सदस्य / सदस्या संख्या २२ अशी एकूण १२९ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा, गुलमोहोर, गोल्डन शॉवर (भावा) रोपांचे समावेश होता. 

सभापती, उपसभापती व सदस्या/सदस्या, गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी व सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समिती अंर्तगत सर्व आस्थापना मिळूण एकूण ७१८५ रोपांचे वृक्षारोपन तालुकास्तर सर्व कार्यालये, ग्रामपंचयात व जि.प.शाळा अंतर्गत करण्यात येणार असलेचे व सर्व वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी पदनिहाय निश्चित केलेचे गट विकास अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.

यावेळी सभापती शोभा साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी उपसभापती किशोर सुळ, पचांयत समिती सदस्य गजानन एकतपूरे, मानसिंग मोहिते, नानासाहेब नाईकनवरे, विकास कोळेकर, ताई महाडिक, अर्जुन धाईंजे, हसीना शेख,माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, शहाजी महाडिक व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित राहून वृक्षारोपन करणेत आले.