वनपाल गणेश दुधाळ यांनी घोणस सापास दिले जीवदान!

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत नियत क्षेत्रातील मौजे येळदरी येथील वाघमारे  यांच्या शेततलावात घोणस जातीचा साप पाण्यात पडला असल्याची माहिती जत वनविभागास मिळाली.या सापास सुरक्षित बाहेर काढण्यात वन विभागास यश आले.       

अधिक माहिती अशी की, येळदरी ता. जत येथील वाघमारे यांच्या शेतातील शेततळ्यात घोणस जातीचा साप पाण्यात अडकल्याचे वनविभागास कळविण्यात आले. यावेळी जत वनविभागाचे वनपाल गणेश दुधाळ व वाळेखिंडीचे वनपाल प्रकाश गडदे यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनी घोणस सापाला जीवदान दिले व यशस्वीरीत्या बाहेर काढले. त्यानंतर त्या सापास जवळच असलेल्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.या कामगिरीबद्दल येळदरी परिसरात समाधान व्यक्त होत आहे.