
३०१ केसेस, १ लाख ५ हजार ७०० रु. दंड वसूल;६२ गाड्या जप्त
मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई सुरुच
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:
विनाकारण बाहेर पडल्यास ५००रु दंड तर लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहन जप्त करण्याची कारवाई माळशिरस पोलिसांमार्फत सुरू झाली आहे.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ब्रेक द चैन अंतर्गत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्द सोडुन जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यावर५००रु दंड तर लॉकडाउन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहन ताब्यात घेण्याचे पोलीस प्रशासनाला दिले आहेत.त्याअनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे माळशिरस शहरात व परिसरात मोकाट फिरणाऱ्यांवर कार्यवाही होत आहे.त्यामुळे आता ब्रेक द चैन खऱ्या अर्थाने होईल. नेहमी माळशिरस शहरातील हनुमान चौक, माऊली चौक,राजमाता अहिल्यादेवी चौक तसेच बस स्थानकासमोरील भाग अशा प्रमुख ठिकाणी बिनकामाची गर्दी नेहमीच असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रमुख ठिकाणी थांबूनच विनामास्क,विनाकारण फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल आतार, पोलीस नाईक सोनटक्के व पोलीस नायक गायकवाड यांनी कारवाई केली.
आतापर्यंत केलेल्या करवाईनुसार विनामास्क फिरणारे १३६ केसेस व ६८ हजार रु.दंड,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ८८ केसेस व १७६०० रु दंड, सोशिअल डिस्टसिंग ४६ केसेस व ४६०० रु.दंड तर डबल सीट ३१ केसेस व १५५०० रु. दंड अशा आतापर्यंत एकूण ३०१ केसेस झाल्या असून १ लाख ५ हजार ७०० रु. दंड वसूल करण्यात आला आहे . तसेच विनाकारण फिरणाऱ्याच्या ६२ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ महानवर यांचे या कार्याबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती