ग्रामीण मार्गांच्या दुरुस्तीसाठी दिलासा
१० रस्त्यांच्या कामासाठी १ कोटी,३२ लाख मंजूर
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासाठी नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींना साकडे घातले होते. याच अनुषंगाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागाला रस्त्याच्या बाबतीत दिलासा मिळाला असून जिल्हा वार्षिक योजनेतून ३० / ५४ व ५० / ५४ या योजनेतून १ कोटी, ३२ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली. तालुक्याच्या विकासासाठी निधीची अनेकवेळा मागणी करण्यात येत होती.प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था चर्चेचा विषय ठरली होती. याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व राम सातपुते यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील विविध विकास कामांना यावेळी पुन्हा झुकते माप मिळाले असल्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे.’या’ मार्गाची होणार दुरुस्ती!गिरवी ते भांबुर्डी २० लाख रुपये, चांदापुरी कुस्मोड मळवली १० लाख रुपये, तिरवंडी रेडणी जिल्हा हद्द १४ लाख रुपये, कन्हेर ते गिरवी रस्ता ते आठ नंबर चौकी१४ लाख रुपये ,सदाशिवनगर करेवस्ती गोरेवस्ती १४ लाख रुपये, तिरवंडी ते वाघमोडेवस्ती १४ लाख रुपये,फोंडशिरस कोडलकरवस्ती ते रुपनवरवस्ती कदमवाडी १४ लाख,मोटेवाडी बालाजीनगर ते खरातवस्ती १४ लाख रुपये ,बाबुळगाव ते माधवमळा १४ लाख रुपये, कण्हेर गिरवी रस्ता ते कण्हेर चौकी बापूराव लोटे ते कण्हेर चौकी १४ लाख रुपये असा विविध रस्त्यांच्या सुधारणा, दुरुस्ती करण्यासाठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती