वाढदिवसानिमित्त सुरक्षा साधनांचे वाटप

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

अहिल्या वाघमोडे हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला .
सध्या कोरोना महामारीचे जगावर संकट असल्याने अनोख्या पद्धतीने वायपट खर्च न करता अहिल्या तानाजी वाघमोडे हिच्या वाढदिवसानिमित्त पोलीस प्रशासन व माळशिरस केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच पत्रकार बांधवाना मास्क , सँनिटायझर ,रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करणाऱ्या गुळवेल आयुर्वेदिक गोळ्या वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला .
यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड ,माळशिरस केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बंडू अंबुडकर,श्रीकांत पंचवाघ,नितीन गायकवाड ,सुरेश (भाऊ )टेळे ,मकरंद कुदळे,शोभा वाघमोडे,पत्रकार तानाजी वाघमोडे , गहिनीनाथ वाघंबरे,एल.डी.वाघमोडे,अनंत दोशी , श्रीनिवास कदम,श्रीमंत बनकर,संजय हुलगे व मान्यवर उपस्थित होते.