गोरडवाडीच्या शेतक-यांचे महावितरण कार्यालयासमोर आंदोलन

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

गोरडवाडी (ता.माळशिरस) येथील शेतक-यांच्यावतीने माळशिरस येथील महावितरण कार्यालयासमोर शेतीपंप व सिंगलफेज विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत माळशिरस कार्यालयाचे उपअभियंता प्रवीण कुंभारे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच दिपक गोरड ,बाळासाहेब गोरड,विजय गोरड,पांडुरंग पिसे,रामचंद्र गोरड,शरद कर्णवर,दादा हुलगे,दादा गोरड,अजिनाथ कर्णवर,संतोष गोरड,तुकाराम यमगर,किसन गोरड,सोमनाथ गोरड,आप्पा गोरड,दत्तू गोरड,संजय सरगर, संजय कोळेकर ,विनायक गोरड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            गोरडवाडी गावच्या शेती पंपाला थ्रीफेज लाईट मिळत नसल्याने शेतातील्या पिकांचे नुकसान होत असून पिके जळून चालली आहेत.तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.१० वी,१२ वी विद्यार्थांच्या परीक्षा सुरु होत असून लाईट नसल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.यासाठी येथील ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी उपअभियंता प्रवीण कुंभारे म्हणाले कि,आपल्या मागण्याचा विचार करून यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिल्यानंतर शेतक-यांनी हे आंदोलन मागे घेतले.कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.