संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
रेडे ग्रामपंचायतीमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी सरपंच ताई आप्पा शेंडगे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य उज्वला काळे ,इंंदूमती काळे, दिपाली काळे,राजश्री शेंडगे,बर्वे,अंगणवाडी सेविक प्रविणा रणपिसे,स्वप्नाली धाईंजे,वैशाली नामदास,सायली रणपिसे,पुष्पा काळे, मदतनीस लतिका कांबळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमामध्ये राजश्री नवनाथ शेंडगे यांनी महिलादिनानिमित्त मनोगत व्यक्त करून महिला सक्षमीकरण याबाबत प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.महिलादिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कोविड १९ बाबत नवीन अधिसूचना व जनजागृती, महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्याबाबत विचारविनियम करण्यात आला.महिला सभेचे विषय वाचन ग्रामविकास अधिकारी सोमनाथ होळ यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य पत्रकार आनंद शेंडगे यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद