आदेश डावलून रस्त्यावर केबल लाईनचे काम

सुभाष हाक्के
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कोसारी:

जत तालुक्यातील कुंभारी,कोसारी,काशिलिंगवाडी,सिंगनहळ्ळी या रस्त्यावर आदेश डावलून एअरटेल कंपनीच्या केबल लाईनचे काम अनाधिकपणे चालू आहे.
रस्त्यावरील साईडपट्टीतुन एअटेल कंपनीचे केबल पुरले जात आहे. या नियमबाह्य खाजगी कामामुळे मुख्य शासकीय रस्ता खराब होत आहे.
हे काम ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब भोसले आणि उत्तम महारनुर यांनी बंद ठेवले आहे. हे काम थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही ते म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली असताना रस्त्यालगतची साईडपट्टी गटार आहे,त्याच्या बाजुने केबल टाकावी,असे आदेश दिले असतानाही केबल बाजुने न टाकता रोडवरील साईडपट्टीवर केबल टाकली जात आहे. यातुन मुख्य रस्ता खराब होत आहे. याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती संतप्त नागरिकासह नानासाहेब भोसले आणि उत्तम महारनुर यांनी दिली आहे.