
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
दळणवळणाच्या साधनांपैकी विमान,रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत.खाजगी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवासासाठी कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे प्रवाशांना एसटीमध्ये मोफत मनोरंजनासाठी वाय-फायची सोय उपलब्ध झाली होती.परंतु अनेक दिवसांपासून एसटीमधील वायफाय सुविधा बंद असल्यामुळे तालुक्यातील प्रवासी वर्गामधून नाराजी व्यक्त केली जात असून कोट्यावधीचा खर्च वाया गेला आहे.
राज्य परिवहन मंडळाकडून दोन वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वाय-फायची सुविधा करून दिली होती. त्यामुळे स्मार्ट फोन धारकांसाठी एसटीमध्ये मनोरंजनाची सोय झाली होती.मात्र प्रवाशांना या बाबीची साथ मर्यादित ठरली. काही महिन्यातच वायफायचा बोजवारा उडाला.एसटीमधून वाय-फायचे डबे नाहीसे झालेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली ही सुविधा बंद पडली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून प्रवाशांसाठी देण्यात आलेल्या सुविधा बोजवारा उडाला असून एसटीमधील वायफायच्या पेट्या गायब झाल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बसमधील स्मार्टफोन
धारक स्टोअर केलेले कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेत होते.याच बातम्या, चित्रपट ,ध्वनिफीत गाणे ,दिसणारी गाणी, कथा ,कादंबरी किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचन केले जात होते.
त्याचप्रमाणे लहान बालकांसाठी कार्टून, व्हिडिओ गेम सुविधा उपलब्ध होती. महिलांसाठी स्त्री सिरीयलची सुविधा होती. मात्र, काही दिवसातच या सुविधाचा बोजवारा उडाला. काही दिवसातच वायफाय गायब झाले असल्याचे प्रवासी वर्गामधून बोलले जात आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक