सांगली जिल्ह्यातील 30 ते 35 हजार कामगारांचा समावेश : अनुप वाडेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आष्टा:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ गृह उपयोगी वस्तु संच वितरण करण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असुन त्यांना गृहउपयोगी वस्तु संच देण्यात येणार आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील 30 ते 35 हजार नोंदीत बांधकाम कामगारांचा समावेश आहे. याचा लाभ मिळणार आहे,अशी माहिती सांगली जिल्हा बांधकाम कामगार महासंघ संलग्न भारतीय मजूर संघ जिल्हाध्यक्ष अनुप वाडेकर यांनी दिली. तसेच गृह उपयोगी वस्तू कामगारांच्या नव्याने निवासी, पाल्याचे शिक्षण, आरोग्य विषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते.त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सह्यक व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी २७ आक्टोबर२०२० रोजी बैठकीत राज्यातील १० लाख नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबत ठराव मंजूर केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत लाभार्थी बांधकाम स्थलांतरित बांधकाम कामगारांना व्हावी व प्रेशर कुकर सहित इतर २७ प्रकारचे भांडी संच यामध्ये वितरित होणार आहेत. तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय व जीवित नोंदणी असणे आवश्यक आहे अशी माहिती सांगली जिल्हा अध्यक्ष अनुप वाडेकर यांनी दिली.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक