जतमध्ये पोलिसांचा रूटमार्च व नागरिकांना सूचना

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

३१ डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना नागरिकांनी कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी केले आहे .
सध्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहिता सुरू आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांचेकडून जमावबंदी आदेश लागू आहेत. ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे. तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता यंदाचा ३१ डिसेंबर कुटुंबासोबत साधेपणाने साजरा करावा.
साऊंड/स्पीकर/DJ सिस्टम लावू नये. असे केल्यास मा. न्यायालयामार्फत दंडात्मक कारवाई होऊ शकते.
फटाके वाजवू नयेत. मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश व जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग होऊन कलम 188 प्रमाणे कारवाई होऊ शकते.
दारू पिवून बेदरकार वाहने चालवू नयेत. यामुळे आपले व इतरांचे जीवित धोक्यात येते. आपणावर मो. वा. का. क. 185 प्रमाणे कारवाई होऊन आपला परवाना निलंबित होऊ शकतो.
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करू नये. यामुळे आपणावर महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई होऊ शकते.
हॉटेल व परमिट रूम चालकानी आपल्या आस्थापना वेळेत बंद कराव्यात. न केल्यास आपणावर महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे कारवाई होऊ शकते.
वरीलप्रमाणे कारवाई झाल्यास आपला पासपोर्ट, चरित्र पडताळणी व इतर सरकारी कामांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांवर परिणाम होऊन नोकरी व व्यवसाय सुरू करण्यास अडचणी येवू शकतात,असे आवाहन केले आहे .