लोकशाहीच्या ४थ्या स्तंभाचा गळा घोटणारे गुन्हेगार कोण?
या पापाचे भागीदार कोण?
लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजेब लोकशाही!
निवडून आलेले लोकनेते ,प्रशासन,न्यायव्यवस्था आणि चौथा स्तंभ प्रसिद्धी माध्यमे!
३स्तंभांना अनेक विशेषाधिकार!
४थ्यामधील काही मूठभरांना सुविधा ,सवलतींची खैरात!
लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे पत्रकार व सर्व माध्यमकर्मी!
४स्तंभाचे बडे चालक,मालक सर्व सुविधा,जमिनी ,सन्मान घेत प्रतिष्ठित गब्बर!
ज्याचे श्रमावर वृत्तपत्र,वृत्तवाहिन्या चालतात त्यांचे व वरिष्ठांचे पगारात भलतीच तफावत!
सरकारकडे मदत मागितली तर मुख्यमंत्र्यांपासून ते सगळे तोंडदेखले आम्ही सोबत आहोत,मदत करु म्हणतात!
कागदपत्रे पुढे गेली की लालफितीवाले हे लोक सरकारी सेवक नाहीत,मदत कशी करायची म्हणत मोठं ? उभं करतात!
खाजगी संस्थात आपण कसा हस्तक्षेप करणार असा बालिश आणि मदत मागणा-यांना मुर्खात काढणारं उत्तर देतात!
बडे बडे मिडियावाले राज्यात येतात दुकान थाटतात आणि सर्व फायदे घेतात!
आपल्या प्रसिद्धीपुरते नेते यांचेकडे पाहतात आणि तवीच कृती करतात!
लालफितीवर जर राज्यकर्तेंची पकड नसेल आणि समाजात सकारात्मक काम होण्यासाठी यांचेकडून काम करवून घेण्याची मानसिकता नसेल तर ?
न्यायदेवतेबद्दल तर न बोलणे उचित!
पत्रकारांच्या हक्काच्या मजिठिया वेजबोर्ड निकालावर …जो मागेल त्याला मिळावा…!असा शेरा मारुन एक मोठी क्रांती केली!
त्यानंतर त्यांना केंद्रात मानाचं पान मिळालं!
हक्क मागणा-यांना वेळेत न्याय मिळाल्याच्या घटना कमीच!
खूप प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरही पक्की ठाऊक आहेत!
लोकशाहीचे गुन्हेगार कोण तेही सगळेच जाणतात!,पण प्रचंड आप्पलपोटेपणा आणि वर्चस्ववाद यांनी पछाडलेले लोक लोकशाहीच्या सच्चा ४थ्या स्तंभाला बळकटी देण्याचा विचारही करत नाहीत!
गब्बर मालक नि शायनर लोकांभोवती यांचे हितसंबंध फिरतात!
आणि याचाच प्रत्यय सर्वत्र येतो!
खाजगी संस्था कंपन्या म्हणता ना मग प्रसार माध्यमाचे आर्थिक लाभ ,जमिनी इतर फायदे ,मानसन्मान यांना का देता?
हर एक जिल्ह्यात मिडिया मालकांनी त्यांच्या चाटूकार बगलबच्च्यांनी जमिनी मिळवल्यात!
मोठ्या म्हणवणा-या अनेक मिडियाकर्मींनी चार-चार घर घेऊन विकलीत!
जर सर्व लाभ मिडिया म्हणून देत असू तर कोरोनाने मृत पावलेल्या पत्रकारांचे कुटुंबियांना वीमा सरंक्षण कवचाचे पैसे का नाही मिळाले?
कुणीचं लक्ष देत नाहीत!का तेही ठाऊक!
सर्व उद्योगांसाठी गालिचे मदतींची खैरात!
मग आमचा दोष काय?
केंद्राने आम्हाला संपवण्याचा कायदा केला!
आम्हाला विचारलं?
कोण होते सल्लागार?
का इतर कर्मचा-यांना यातून वगळलं?
का न्याय मागण्याचा अधिकार काढून टाकला?
का आमचा विशेष वेतन आयोगाचा अधिकार काढला?
कोणत्या हक्काने आम्हाला कामावरुन कधीही काढून टाकण्याचा अधिकार दिला?
आपल्याला मतदान लोकांनी केलं ते सेवा करण्यासाठी न की, आमचे गळे दाबण्यासाठी!
कोरोना काळात तर मालकांनी छटाईखाना जोरदार सुरु ठेवला,मिडियाला पँकेज द्या म्हणून आम्हीही निवेदने दिली.
चौथा स्तंभ जमीन दोस्त करुन आपल्या तालावर नाचणारी माकडं यांना हवी आहेत.
मिडियाचे नावाने थैमान करणारे समाजात वाढलेत!
सरकार व यंत्रणा नेहमी एक गहन प्रश्न उभा करतात!
खरे पत्रकार कोण?
आम्हीही म्हणतो,खरंच खरे पत्रकार कोण व किती ही पडताळणी एकदाच होऊन जाऊदे!
यातील घुसखोर,कचरा बाजूला होउ दे!
पत्रकारांना जाहिरात एजंट,वेंडर असे विविध नावे होणारे शोषण थांबू देत!
किमान वेतन,पूर्ण,अर्ध व अंशकालिन यांना मिळू दे!
आम्ही तयार आहोत!
पत्रकार रजिस्ट्रेशनसाठी!
आमचे विषय,अडचणी मांडून तत्काळ दखल घेता यावी म्हणून हवंय महामंडळ!त्रिपक्षीय समिती
दलाल आणि आमचे नावी लोणी खाणारे उचलून बाजुला फेकण्याची निकड आहे!
आम्ही आमचे हक्क घेऊ येऊ देत समोरासमोर मालक!
खोटेपणा आणि श्रमिकांचे चाललेले शोषण यांचा आरसा दाखवू!
ज्येष्ठांना सन्मान देताय तर तो सन्मानानेच देणे अत्यावश्यक आहे!
महाराष्ट्रात या मागणीला पहिली सुरुवात झालीय!
आमच्या मागण्या आमचे हक्काच्या आहेत!
समोर बसून त्या समजून घेण्याची व सोडवण्याची निकड आहे.
जर सच्चा पत्रकारांला संपवू पाहाल तर ते कठीण आहे!
तितकेच ते लोकशाहीसाठी घातक आहे!
राज्यकर्ते असावेत शिवरायांसारखे!
जे जनतेचे दुःख जाणतात!
गुणीजनांची वेळीच कदर करतात!
आई भवानीचरणी हेच मागणे आम्हाला न्याय दे!
आमच्यावर अन्याय करणारे गुन्हेगारांना त्यांची जागा दाखव आणि पापाचे वाटेक-यांना सदबुद्धी दे!
आमच्या हक्कासाठी लढण्याचं बळ,दिले आहेसच !
आता नवीन वर्षात आत्मक्लेष आंदोलन !
शीतल करदेकर
अध्यक्ष:एनयुजे महाराष्ट्र
सचिव: एनयुजे इंडिया
7021616645


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक