सरपंच नितीन काळेंनी वाचविला अजित पवार यांचा जीव

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ पंढरपूर:
सरपंच सेवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी अपघातातील जखमी मंगळवेढ्यातील अजित पवार यांचा तातडीने उपचारास दाखल करून जीव वाचविला.
सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे पंढरपुरातून तावशीकडे जात असताना मंगळवेढा रोडवरील विसावा येथे पिक अप व दुचाकी गाडीचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.अजित पवार हे व्यक्ती अत्यंत जखमी अवस्थेत असताना त्या व्यक्तीला कोणी हात लावण्यास तयार नव्हते. पोलिस पाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना लगेच फोन करून त्याठिकाणी त्यांनी प्रशासनाला बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी तातडीने त्याठिकाणी प्रशासनाला पाठवून दिले .नितीन काळे हे पंढरपूर तावशी प्रवास करीत असताना त्यांना पवार हे अत्यंत जखमी अवस्थेत दिसले व त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता अजित पवार यांना लाईफ लाईन दवाखान्यामध्ये स्वतः घेऊन जाऊन त्यांना तातडीने इलाज करा व पेशंट बरोबर कोणीही नातेवाईक नाही, मी त्यांचा मित्र आहे असे सांगून डॉक्टरांना तातडीचे उपचार करण्यास सांगितले. अजित पवार यांचेवर डॉ.क्षीरसागर यांनी तातडीचे इलाज केले.नंतर त्यांचे नातेवाईक आल्यानंतर पेशंटला सोलापूर येथे हलविण्यात आले. तोपर्यंत नितीन काळे उपस्थित होते. नितीन काळे यांचे आभार पवार कुटुंब यांनी मानले.आमच्या मुलाचा जीव वाचविला.कोणीही आमच्या मुलाजवळ जाण्यास तयार नव्हते. आम्ही आभार मानतोअसे नातेवाईक म्हणाले. नितीन काळे यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.