माध्यमकर्मींना संपवणारा कामगार कायदा २०२० महाराष्ट्रात लागू करु नये:एनयुजे महाराष्ट्र

माध्यमकर्मींयांच्या हितासाठी कायद्यात बदल तसेच विविध मागण्यांचा विचार व कृती तातडीने व्हावी यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
केंद्र सरकारने लागू केलेला श्रमिक पत्रकारांसह सर्व माध्यमकर्मींना संपवणारा “कामगार कायदा २०२०” आहे तसाच महाराष्ट्रात लागू करण्यास नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रने विरोध केला असून संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबतची निवेदने देण्यात महाराष्ट्र सरकारला देण्यात येत आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे व इतर कर्मचाऱ्यांच्या कामावर व हक्कांवर गदा आणली आहे आणि म्हणूनच या काळ्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करु नये, यासाठी एनयुजेमहाराष्ट्र कडून महाराष्ट्रभर कामगार कायदा २०२० चा निषेध करण्यात येतो आहे.
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना संविधानदिनी निवेदन देऊन तो नोंदविण्यात आला.
जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी एनयुजे महाराष्ट्र ठाणेचे योगेश गोडे, पी.वी.आनंद पद्मनाभन, एस.वाघमारे, दीपक चिंदरकर, विलास उपशाम, मोनिष गायकवाड, तुषार गोसावी, स्वप्नील पाटील, राकेश पाटील आदी उपस्थित होते.
कामगार कायदा २०२० कायद्यात माध्यमकर्मींंच्या हिताचे बदल राज्य सरकारने करणे आवश्यक आहेत. तसेच माध्यमकर्मी विकास महामंडळ व त्रिपक्षीय समिती गठण, पत्रकार रजिस्ट्रेशन सामुहिक आरोग्य विमा योजना सुरू करणेबाबत आणि मागील सरकारने घाईत केलेले निर्णय व जीआर यात सुधारणा करून सर्वसमावेशक धोरण ठरवणे,अधिस्वीकृती व इतर पत्रकार हिताच्या समित्यांची व्यापकता वाढवणे आणि पुनर्गठण करणेची आग्रहाची विनंती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारकडून या निवेदनांचा गंभीरपणे विचार करुन पत्रकारांच्या हिताचा कायदा लवकरात लवकर आणावा,पत्रकारांसाठी एक सर्वसमावेशक हितकारक धोरण ठरवावे असे योगेश गोडे म्हणाले तर केंद्र आणि राज्याच्या वादात तर साध्या रेल्वे प्रवासाची मुभाही आम्हाला मिळत नाही,हे अत्यंत निषेधार्ह व चिंतनीय आहे अशी खंतही यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केली.
सन्मानाने जगायचं कसं हा प्रश्न मोठा आहे. जर सरकार आमचेबाबत गंभीर नसेल तर आगामी काळात महाराष्ट्रभरातील माध्यमकर्मीं आंदोलन करतील असे एनयुजेमहाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले.