
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
पुण्य़ातील फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यातर्फे आणि इतर काही संस्था व परोपकारी व्यक्तींद्वारे “गिव्ह विथ डिग्निटी” हा उदात्त उपक्रम किराणा किट्स मोफत देऊन राबवला आहे.
या योजनेमध्ये प्रामुख्याने गरीब शेतकरी, छोटे, लघु व गृहउद्योग यांचेकडून आवश्यक धान्य व वस्तू खरेदी करुन एक समावेशक दिवाळीसाठी संच तयार करून बिळुर या गावातील गरजू कुटुंबांना मोफत वाटप करण्यात आली.या मध्ये विधवा महिला, अपंग व्यक्ती, गरीब कुंटुंब, रोजगार करणारे लोक या गटातील लोक व महामारीने बेकार झालेले लोक यांचे जीवन सुकर होण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम प्रशंसनीय आहे.
त्यानुसार बिळूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून काळभैरव देवस्थानचे चेअरमन सोमलिंगा जिवानवर, सरपंच नागनगोंड पाटील, पंचायत समिती सदस्य रामांना जिवाणवर तसेच बिळूर येथील फिनोलेक्सचे सब डीलर भारत इलेक्ट्रिकलचे मालक चंद्रकांत मुघोळकोट यांच्या शुभ हस्ते किट वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला.
सरपंच म्हणाले की, मुकुल माधव फौंडेशनने आमच्या कठिण परिस्थितीतही दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात मदतीचा हात पुढे करुन काही नसताना दिवाळी साजरी करण्याचे बळ दिले व अर्थातच आनंद दिला अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना फिनोलेक्स पाईप कंपनीचे सह व्यवस्थापक श्री परशुराम ओलेकर यांनी सांगितले की, भारतातील सर्वात मोठ्या पीव्हीसी पाईप्स व फिटिंगचे उत्पादक असलेल्या प्रतिथयश फिनोलेक्स पाईप्सची मुकुल माधव फौंडेशन ही सीएसआर धर्मादाय संस्था आरोग्य, शिक्षण, जलसंधारण व समाजकल्याण या क्षेत्रात कार्यरत असून मा. सौ. रितू छाब्रिया व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
पुढे त्यांनी सांगितले की, या सर्व कोरोना महामारीच्या काळामध्ये फिनोलेक्स पाईप्स व मुकुल माधव फौंडेशनतर्फे समाजातील अश्या प्रकारच्या गरजु घटकांसाठी फुल ना फुलाची पाकळी या भावनेने दिवाळीच्या वेळी “गिव्ह विथ डिग्निटी” योजनेतून मदत केल्याचे समाधान लाभत असल्य़ाचे सांगितले.
वैश्विक महामारीच्या या आव्हानात्मक आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुकुल माधव फौडेशनने गरजूंना दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद आहे. या संकट काळात कोणाचा विसर पडू नये, मदतीपासून वंचित राहू नये यासाठी घेतलेल्या या उदात्त पुढाकाराबद्दल ऋण व्यक्त करतो .अशा भावना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंचांनी यांनी व्यक्त केल्या.या कार्यक्रमास फिनोलेक्स कंपनीचे सांगली जिल्ह्याचे डीलर देसाई मायक्रो इररिगेटर्स चे मालक श्री दीपेन देसाई, निखिल शिंदे, फिनोलेक्स कंपनी चे सह व्यवस्थापक श्री परशुराम ओलेकर, उपसरपंच अण्णाप्पा गडीकर,सदस्य संगप्पा पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती