
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानातील धान्ये गरिबाच्या तोंडातील घास हिसावून खुल्या बाजारात तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात जत महसूल विभागाला यश आले असून बिळूर येथून सुमारे 29 पोती तांदुळ,9 पोती गहू भरलेला टेम्पो(एमएच-10,एक्यू 6405)जप्त करत मोठी कारवाई केली.याप्रकरणी संशयित महादेव कोळी यांच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संशय असणाऱ्या बिळूर येथील 6 स्वस्तधान्य दुकानांतील स्टॉकची तपासणी तहसीलदार सचिन पाटील यांनी स्व:ता केली.बिळूर येथील गावापासून काही अंतरावरील शेतात स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ,गहू जवळपास 38 पोती धान्य भरलेल्या टेम्पो उभा असल्याची माहिती जतचे मंडल अधिकारी संदिप मोरे यांना मिळाली होती.त्या आधारे त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला असता शासनाकडून गरिबांना वाटपासाठी असणारा 29 पोती तांदुळ,9 पोती गहू आढळून आला.टेम्पोसह मुद्देमाल जप्त करत ताब्यात घेण्यात आला आहे. टेम्पोचा चालक महादेव कोळी हा पळून गेला आहे.
दरम्यान या छापाची माहिती मिळताच तहसीलदार सचिन पाटील यांनी बिळूरमध्ये पोहचत सहा दुकानाचे स्टॉक रजिस्टरची तपासणी करून धान्य स्टॉकचा अहवाल घेतला आहे.नेमके हे धान्य कोठून आले, यांची तपासणी सुरू आहेत.यामुळे जत तालुक्यात गरिबाच्या धान्यावर डल्ला मारून गब्बर झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांचा भांडाफोड होणार आहे. त्याशिवाय तालुक्यात अशा धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या मोठे रँकेट समोर येण्याची शक्यता आहे.
ग्रामीण खेड्यात नियमांची पायमल्ली करून प्रशासनाचे नियंत्रण नसल्याची बोंब शिधापत्रिका धारक करीत आहेत. पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून तहसीलदारांमार्फत गटविकास अधिकाऱ्यांना
काळ्या बाजारात तस्करी होणाऱ्या धान्याचा तस्करी पाळेमुळे खणऩ्याचे आवाहन केले.
स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजाराने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बिळूर प्रकरणामुळे उघडकीस आला आहे़.जत तालुक्यात ऐन सणासुदीच्या काळात गरिबांच्या तोंडचा घास काढण्याचे काम दुकानदार करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या