
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं.१ वतीने पोलीस हुतात्मा दिन साजरा
अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:
देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी,कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्यांविरोधात कारवाई करताना, कर्तव्यात कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
याच दिनाचे औचित्य साधून दहिवडी नं.१ शाळेने आज पोलीस ठाणे दहिवडी येथील सर्व अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार शाळेतील निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ते सामाजिक अंतर ठेवून करण्यात आला. यावेळी सर्व शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर शाळेचे उपशिक्षक सागर जाधव या दिनाचे महत्व व इतिहास सांगितला. कोरोना महामारीत उत्तम कार्य करणाऱ्या दहिवडी सर्व परिक्षेत्रातील अधिकारी व पोलीस कर्मचारी याचे आभार व्यक्त केले.
लहान मुलांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना अधिकारी व कर्मचारी अगदी भावुक झाले व सर्व चिमुकल्याचे त्यानी कौतुक केले.त्यानंतर पोलीस स्टेशन व इतर सर्व बाबींची मुलांनी माहिती घेतली व कार्यक्रमाची सांगता झाली.शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमसोबतच सह शालेय उपक्रम ही या कोरोना काळात शाळेकडून विविध प्रसंगी रावबले जातात.
यावेळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित ,मुख्याध्यापक विजयकुमार चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अक्षय कोर्डे, अशोक पवार,वर्षा यादव,दिपाली चव्हाण, विकास नाकाडे, बाबुराव निकाळजे, संतोष शेंबडे,धनाजी खांडे व शिक्षक,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती