आ.दिपक चव्हाण यांचा फलटण-कोरेगाव मतदारसंघातील उत्तर कोरेगाव अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या गावांचा दौरा

अनिलकुमार कदम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण:

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील,फडतरवाडी,विखळे,वाठारस्टेशन,दहिगाव,करंजखोप,चवणेश्वर येथील नुकसानग्रस्त कामाची पाहणी करुन संबंधीत अधिका-यांना त्वरीत पंचनामे करुन योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार दिपकराव चव्हाण यांनी दिल्या.
यावेळी संजय साळुंखे उपसभापती,प.स.कोरेगाव, नागेशशेठ जाधव,तालुका कृषी अधिकारी शेळके ,सा.बा.डेरे,जि.प.बांधकाम कुंभार,कृषी अधिकारी जगताप,संदीप धुमाळ, ऋषिकेश जाधव,धनंजय धुमाळ,दयाराम शेरे,विनायक चव्हाण,शिवाजीराव चव्हाण,मधुकर चव्हाण(मामा),गणेश थोरवे,सरपंच मतकर,शिवाजी अहिरेकर,राहुल धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.