
हक्क मिळवायचा नि सन्मान टिकवायचा तर सर्वोतोपरी लढाई अपरिहार्य आहे: एनयुजे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शीतल करदेकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
चांगल्या पत्रकारितेचा अजून अंत झालेला नाही,आणि तो होणारही नाही.
भावनेच्या भरात आपण आपल्या वेदना, खंत व्यक्त करतो हे उचित की अनुचित माहिती नाही,पण नेतृत्व करणा-यांनी खचून जाऊन हताश होणेपेक्षा आपल्या अनुभवातून इतरांना दिशा देणे अपेक्षित असते व महत्त्वाचे!
आपण ना विषारी ना बिनविषारी साप आणि ना कुत्रे!
आपण माणूस आहोत,एका जबाबदारीच्या भूमिकेत आहोत हे विसरून चालणार नाही.
द्वेष,स्वार्थ यांचा बाजार सर्वत्र आहे.भेसळ वाढल्याने स्पर्धेत विखारीपणा आलाय!पण हे हलाहल पचवण्याची ताकद आपल्यापैकी प्रत्येकात नसेल पण ती ताकद फक्त जगण्यासाठी नाही तर सन्मानाने जगण्यासाठी पणाला लावलीच नाही तर त्यांची साप व कुत्री होताना आपण पाहतोय.
बिस्किटे सोन्याची असली,सरकारी असली तरी ती कामाची नाहीत,सरकारी बिस्किटं खाऊन जनतेशी गद्दारी करणारेंची काय दूरावस्था होते ते लवकरच दिसेल!
काहीजण हे भोकूपण कसे वाईट आहे हे सांगत एजाँय करतात,जमेल तसे लचकेही तोडतात, कुणी विष पसरवतात आणि आपणच विजेता असल्याचे भास तयार करतात.
पण हे कायमचे नाही…हा घाण,कचरा, वीष बाहेर पडणारच आहे,पण ते होताना त्याचे झटके सगळ्यांना बसणार!
सध्या पत्रकारिता ही एका समुद्रमंथनातून जात आहे.
कायदे करणारे-प्रशासक,प्रशासन व न्यायव्यवस्था कितीही अन्यायकारक असली तरी लढणं अटळ आहे. कुठे प्रकाशवाटा दिसतील माहित नाही,पण त्या दिसतील हे नक्की!कारण काळोखात जगण्यासाठी सच्चा पत्रकारांचा जन्म झालेला नसतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं!
आम्ही किती बिचारे आहोत हे सांगणारे लिखाण करुन,व्यथीत मनाने आपली नोकरी गेल्यावर कोणताही प्रतिकार न करता शेपुट घालणारे बहाद्दर संख्येने जास्त आहेत.
त्यातही घाबरवणा-या पुचाटांची, गांडूळांची संख्या वाढतेय,ही चिंतेची बाब!
पत्रकारांसाठी पुर्वीच्या कामगार कायद्यात दोन पानं होती ,इतर कायदे त्याला जोडून येत होते,पण तेव्हाही लढणारे कमीच,दुकानं जास्त होती.
आता तर बाजार वाढलाय आणि मोठ्या पदावर बसून सफेद काँलर प्रतिष्ठित म्हणून मिरवणारे,आपल्या सहकारी व हाताखालील लोकांना मदत न करता त्यांना वा-यावर सोडणारे जास्त झालेत;फक्त मी टिकावे बाकीचे जावेत बळी ही विकृती वाढतेय!
होय, ही विकृत गिधाडीवृत्तीच आपल्या चौथ्या स्तंभांला पोखरण्याचं काम करतेय.
हे वाळवीचे किडे कधीतरी मरणार,पण त्यासाठी पेस्ट कंट्रोल इतर कुणी करेल ही वाट पाहत स्वतः काहीच कृती करायची नाही हा घोर मानसिक षंढपणा घातक ठरतोय.
मदत करा म्हणून राजकीय नेत्यांकडे तक्रारी करणारे आपले नावे लेखी तक्रार देण्यासही घाबरतात.
संघटनेच दुकानं चालवणा-या एका महाभागाने आपल्याच वर्तमानपत्रातून जवळपास ५०जणांना कामावरून काढले.
काही तथाकथीत नेते आपल्याला कामावरून काढले की, फक्त एक दुखवटा लेख लिहून सहानुभूती मिळवताना दिसले.
मूळात या भयंकर मंथनातून जर आपलं हित,समाजहित होणे अपेक्षित असेल तर, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कीड साफ होणे आवश्यक आहे!त्यासाठी सच्चा माध्यमकर्मीने आपल्यापरीने अचूक व वेळेत कृती करणे अपेक्षित, आवश्यक आहे.
सुधारित कामगार कायद्यात माध्यमकर्मीचे समूळ उच्चाटन करण्याची बांधणीच केलीय केंद्र सरकारने!
स्व इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या विरोधात लढणारे इतिहास व मानवता धर्म विसरले!आता सरळ-सरळ श्रमिकांना घूसमटून मारायला निघालेत!
मालकांच्या हाती धारदार सुरा देऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला संपवण्याची सुपारी दिलीय यांनी!
शेवटी काय, धनदांडगे आणि प्रशासक हेच देश चालवणार…?हे कठीण आहे!..गँस चेंबरमधे टाकून सर्वसामान्यांना,श्रमिकांना संपवण्याचा विखारी प्रकार आहे!
या परिस्थितीत विचार न करता, जर भावनांचे कड ,उमाळे निराश हताशपणातून वाहू लागले तर स्वतःसोबत इतरांनाही ते अपायकारक आहे.
यासाठी पर्याय एकच! या महामंथनात वाहून न जाता जे लढताहेत त्यांचेसोबत ठाम उभे राहाणे!
लक्ष्य अविचल आणि सतत प्रयत्न यातून ध्येय गाठूच आपण!
गरज आहे आपले हक्क सन्मान मिळवण्यासाठी सहकार व सकारात्मक सहकार्य वृत्तीची!
हिटलर इतरांना मारताना स्वतःच संपला…कसा ते सगळ्यांना माहिती आहे.
रडू नका लढू आपण..नाहीतर स्वतःला चौथ्या स्तंभाची पाईक म्हणू नका!..जो लढेल तोच टिकेल सन्मानाने जगेल!
शीतल करदेकर
अध्यक्ष
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक