हाथरस बलात्कारींना फाशी व्हावी;आटपाडीेत महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय हक्क विकास मंचचे तहसीलदारांना निवेदन

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
:

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय हक्क विकास मंचच्या वतीने आटपाडीचे तहसीलदार यांना देण्यात आले.
विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे, सांगली जिल्हाध्यक्ष शैलेश ऐवळे, आटपाडी तालुकाध्यक्ष ताजुद्दीन झारी, आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे, सामाजिक कडडसार्यकर्ते रवींद्र लांडगे यांच्यासह मंचच्या कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले.
उत्तरप्रदेश येथील हाथरस जिल्ह्यातील चंद्रप्पा परिसरात एका गावातील मनिषा वाल्मिक या 19 वर्षीय पीडितेवर 14 सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार झाला असून तिची जीभ कापली. तसेच मणक्याचे हाडदेखील मोडण्यात आले.बलात्काराच्या घटनेनंतर नऊ दिवसांनी पीडित मुलगी शुद्धीवर आली होती. तिच्यावर दिल्ली येथील सफदरजंग येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.मात्र मुलगी वाचू शकली नाही. अखेर मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी तिचा मृत्यू झाला.या घटनेतील सर्व नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.तसेच तिचा शव अंत्यविधीसाठी घरच्यांना न देता पोलिसांनी स्वतःहून अंत्यविधी केला आणि सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व पोलीसांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.