हाथरस येथील बलात्कार व खून घटनेचा जतमध्ये निषेध

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील अनुसुचित जाती (SC) समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई होऊन योगी सरकार बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देणेत आले.
उत्तरप्रदेश येथील हाथरस या गावातील मनीषा वाल्मीकी या मुलीवर गावातील सवर्ण ठाकूर समाजातील तरुणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची अमानुषपणे हत्या केली आहे. तसेच जेंव्हापासून उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार बनून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले आहेत, तेंव्हापासून अनुसुचित जाती/जमाती तसेच इतर मागासवर्गींय समाजावर सातत्याने अन्याय,अत्याचार होत आहेत. जातीयवादी मानसिकतेतून त्याठिकाणी कारभार चालला असून मागासवर्गीय लोक दहशतीखाली जगत आहेत.
ज्या लोकांनी मनीषा वाल्मीकी हिचा बलात्कार करुन खून केला आहे,त्या सर्व प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या निगराणीखाली सखोल चौकशी होऊन दोषींना 6 महिन्याच्या आत फासावर लटकविले पाहिजे.तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करुन त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून त्यांची मठामध्ये रवानगी करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, बामसेफ संयोजक महेश शिंदे, बी.व्ही.एफ सहसंयोजक मेसाप्पा काटे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन इ. उपस्थित होते.