माडगुळे येथील ‘चेअरमन’ शिवाजीराव विभुते यांचे निधन

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे
:
माडगुळे येथील शिवाजी सुखदेव विभुते यांचे आज दि.५ रोजी कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५५व्या वर्षी दुःखद निधन झाले.शिवाजीराव विभुते हे सर्वसामान्याचे नेतृत्व करणारे एक व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात आपली प्रतिष्ठा पणाला लावून वेगवेगळी कामे केली. ते माडगुळे विकास सोसायटीचे चेअरमन होते. त्यांना सर्वसामान्य लोक चेअरमन या नावानेच ओळखत होते.त्यांच्या दुःखद निधनाने सर्व माडगूळे गाव एका कर्तबगार नेत्याला मुकला. त्यांच्या पश्चात एक भाऊ, दोन मुले,पत्नी व सुना नातवंडे असा परिवार आहे.