पुणे शिक्षक/पदवीधर मतदारसंघातून नवतरूणांला संधी द्यावी- प्रा.एन.पी.खरजे व शिष्टमंडळाची आग्रही मागणी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

                    महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांना पुणे शिक्षक/पदवीधर मतदारसंघातून प्रामाणिक, उच्चशिक्षित नवतरूणांला संधी द्यावी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे निवेदन प्रा.एन.पी.खरजे प्रा.प्रविण गावडे, दिलीप कचरे, राघवदादा मेटकरी,सागर पाटील व पदाधिकारी यांनी दिले.
आम्ही सत्यासाठी सदैव संघर्ष  महाराष्ट्र व मित्रपरिवार यांनी महाराष्ट्रातील नवीन २४५० ते २५०० पदवीधर मतदार यांची आनलाईन नोंद केली आहे. तसेच यावेळी जास्त प्रमाणात नवतरुण मतदारांची नोंद झाली आहे.महाविकास आघाडी/राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे पदवीधर/शिक्षक मतदारसंघातून होतकरू उच्च शिक्षित, शैक्षणिक प्रश्नांची जाण असलेल्या तरूणाला प्रतिनिधित्व मिळावे. जेणेकरून शैक्षणिक समस्या चांगल्याप्रकारे सोडविण्यासाठी ते कायमच सक्रियपणे जबाबदारीने काम करतील.
तसेच नवतरूणांना संधी दिल्याने राजकारण, समाजकार्य, शैक्षणिक कार्य करण्यासाठी महाराष्ट्रातील तरूण प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येऊ शकतील. ती संधी सत्तेपासून वंचित असलेल्या घटकांना मिळवून द्यावी.
अशी  विनंती प्रा.एन.पी.खरजे व शिष्टमंडळ यांनी केली.