असंवेदनशील राज्य सरकार व केंद्र सरकार!

असंवेदनशील राज्य सरकार व केंद्र सरकार!
मुख्यमंत्र्यांकडे पत्रकार विषयी अनेक निवेदने दिली.

मुख्यमंत्री महोदय
उद्योजक,हाँटेलवाले,इतर व्यावसायिक, यांचेशी चर्चा करतात,मार्ग काढतात!

पण पत्रकारांचा विषय खाजगी संस्था म्हणून बाजुला ठेवतात!
इतर लोक खाजगी नाहीत काय?

हजारोंच्या नोकऱ्या गेल्यात,पगार देत नाहीत,आर्थिक पॅकेज मागतोय,
जाहिरात दर झटकन वाढवले,मालकांना नुकसान झाले म्हणून मदत करतात,
मग आम्ही भिकारी आहोत का?

का आम्ही पाकिस्तानचे नागरिक आहोत?
महाराष्ट्रात असून आमचा विचार होणार नसेल तर उपयोग काय?
आम्ही चौथा स्तंभ आहोत आणि मिडिया काम करतोय हा आमचा दोष आहे काय?

इतका दुजाभाव?
इतके घाबरता मिडिया मालकांना?

केंद्राने श्रमिकांना संपवण्याचा कायदा केला,पत्रकारांकडे दुर्लक्ष केलंय,आव मात्र आमचेवर उपकार करण्याचा!आमची कामावरून कधिही कामावरून काढले जाऊ शकते!
इतर फायदे दिले म्हणतात!मात्र हा प्रकार बळीच्या बकऱ्याला मारण्याआधी खाऊपिऊ घालण्याचा प्रकार आहे!

कृषी कायद्या विरोधात सर्व रस्त्यावर उतरले,पण आमचं काय?
यांना चौथा स्तंभ सक्षम करायचाच नाही!यांचे तालावर नाचणारे जोकर हवेत!

महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री एकाही मदतीच्या निवेदनावर कृती करत नाहीत निर्णय घेत नाहीत!इतका अन्याय का करत आहेत?
हा प्रश्न विचारतोय आम्ही?

शीतल करदेकर
अध्यक्ष
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र