पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सेवा सप्ताहाचे आयोजन; वाड्यात राबविले स्वच्छता अभियान !

संजय लांडगे
वाडा/प्रतिनिधी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित देशभर आयोजित केलेल्या  सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने वाडा तालुका बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी वाडा तालुक्यातील प्रसिद्ध पांडवकालीन प्राचीन तीळसेश्वर मंदिराच्या परिसरातील दशक्रियाविधी घाटाची स्वच्छता केली. तसेच वाडा शहरातील स्मशानभूमीची स्वच्छता केली.
 या स्वच्छता मोहिमेत भाजपचे जेष्ठ नेते बाबाजी कठोले,पालघर भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील,पालघर भाजपा उपाध्यक्ष संदीप पवार, भाजपा वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या उपस्थितीत  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तसेच वाडा तालुक्यतील भाजपा युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने रक्तदान तसेच प्लाझ्मादान ,वृक्षारोपण असे  विविध उपक्रम जिल्हाभर राबविले जाणार असल्याची माहिती भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी दिली.