प्रधानमंत्री आवास योजनेतील थकित हप्ते मिळावे यासाठी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन

मुख्तार मणियार
औसा/प्रतिनिधी:

औसा शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ११६ लाभार्थ्यांना थकित तिस-या हफ्त्याचा निधी व १२९ पात्र लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा निधी त्वरीत मिळावा,यासाठी औसा येथील सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला यांनी नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
नगरपालिकेमार्फत औसा शहरातील एकूण 245 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना मंजूर झाली आहे.त्यापैकी फक्त 116 लाभार्थ्यांना दोन हप्त्यात एकूण एक लाख रुपये प्राप्त झाले आहेत.या रकमेतून 116 कुटुंबांनी स्वतःचे राहते कच्चे घर पाडून बांधकाम चालू केले आहेत व ते बांधकाम अर्धवट स्वरूपात असून त्याची पुढच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम न मिळाल्याने मागील सात-आठ महिन्यांपासून थांबले आहेत व काही लोकांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे आणून बांधकाम पूर्ण केले आहेत. तरी या त्रस्त असलेल्या लाभार्थींकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते खूनमीर मुल्ला यांनी नगर पालिके समोर 8 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ता खुंदमीर मुल्ला, राजेंद्र बाबु जाधव, शेख जावेद नजीर,सय्यद फैय्याज,अजीतं सुरज पांडे, अशोक पवार,जमावोद्दीन अब्बास सौदागर आदि उपस्थित होते.