
जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा ऊसतोड कामगारांसाठी उपक्रम
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
मा. जिल्हाधिकारी अशोक काकडे व मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यातील ऊसतोड कामगार यांच्यामध्ये एचआयव्ही एड्स व गुप्तरोग याविषयी जनजागृती करणे कामी सर्व जिल्ह्यातील साखर कारखाना यांना सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आटपाडी येथील सद्गुरु श्री. श्री साखर कारखाना राजेवाडी ता.आटपाडी जि. सांगली यांच्यावतीने एचआयव्ही एड्स समुपदेशन शिबिर दिनांक 06/02/2026 रोजी उपकेंद्र गळवेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रसंगी प्रथमता सद्गुरु श्री श्री च्या व धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. मा.श्री विवेक सावंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी (जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष) सिव्हिल हॉस्पिटल सांगली. मा. डॉक्टर तांबोळी मॅडम कारखान्याचे मा.श्री सुनील सावंत मुख्य शेती अधिकारी विलास पिसे ऊस पुरवठा अधिकारी व समुपदेशक शंकर संकपाळ ग्रामीण रुग्णालय आटपाडी.
मा.डॉ.तांबोळी मॅडम यांनी महिला विषयी वैयक्तिक आरोग्य, स्त्रियांचे आजार, पोषण, स्वच्छता स्तनपान व काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री संकपाळ समुपदेशक यांनी एचआयव्ही एड्स या रोगाविषयी सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले व एच आय व्ही एड्स संदर्भातील पोस्टर प्रदर्शन आयोजित करून सर्व ऊसतोड कामगारांना याविषयी मार्गदर्शन केले. व इच्छुक कामगारांचे एचआयव्ही तपासणी करण्यात आले. तसेच एच आय व्ही एड्स विषयी पत्रिका वाटण्यात आले.तसेच अधिक माहितीविषयी १०९७ या फ्री हेल्पलाईनचा वापर करावा असे सांगण्यात आले. तसेच ऊसतोड कामगार यांना अल्पपोहार ची व्यवस्था सद्गुरु श्री श्री साखर कारखाना राजेवाडी यांच्याकडून करण्यात आला होता.या आरोग्य शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दिघंची कडील डॉ. डी व्ही सावंत. श्री खिलारे. श्री पाटील. श्री भोसले व आरोग्य सहाय्यक श्री ढवळे. श्रीमती वंदना पवार. श्रीमती सरिता चव्हाण व कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती