‘येळकोट येळकोट घे” च्या उद्घोषात व भंडारा खोबरे यांच्या उधळणीत माडगूळे येथे खंडोबा यात्रा संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगूळे

सालाबादप्रमाणे माडगूळे येथे येळकोट येळकोट घे च्या उद्गोषात व भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत माडगूळे येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडोबा यात्रा संपन्न झाली आज चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर दुपारी पाच वाजता देवाचा नंगर व पालखी मंदिर परिसरात मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून वाघ्यांच्या हस्ते नंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या यात्रेला लाखो भावी उपस्थित होते

आजच्या यात्रेत यात्रा समितीने एक चांगल्या प्रकारचे नियोजन करून जेणेकरून यात्रेस येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही यात्रा स्थळी मेव मिठाईचे स्टॉल , खेळण्याचे स्टॉल, मनोरंजनाचे स्टॉल, भंडारा खोबऱ्याचे स्टॉल, नारळाचे स्टॉल ,खेळण्याचे स्टॉल व इतर स्टॉल लावण्याचे नियोजन तसेच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तसेच स्वच्छ पाणीपुरवठा करून यात्रेस येणाऱ्या भाविकांची चांगल्या प्रकारे सेवा केली.

गेल्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी देवाचा घटस्थापना करून यात्रेला सुरुवात झाली दररोज संध्याकाळी गावातून ढोल ताशाच्या गजरात आपल्या हातात दिवट्या घेऊन देवाला व मंदिरला प्रदक्षिणा व देवाची आरती करून केली जाते, संध्याकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रम साठी आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता.