
२० रोजी ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी शिबिर; सहभागासाठी महिलांना आव्हान
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फेत सशक्त नारी-सशक्त परिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. कुटुंबांचा गाडा हाकणाऱ्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांची आरोग्य तपासणी निरोगी जीवनशैलीसाठी पोषण व नागरिकांचे योगदान यावर आधारित हा उपक्रम महिलांच्या आरोग्य प्रति समर्पित करण्यात आला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत हा उपक्रम राज्यभर राबविला जात आहे. त्याच अनुषंगाने आटपाडीमध्ये शनिवार दि. 20 सप्टेंबर रोजी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षिका वृषाली राऊत यांनी दिली.
मागील काही वर्षात महिलांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे वयाच्या 40 नंतर वाढणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी कमी वयातच आढळत आहेत आहार, विहार, जीवनशैली यामुळे अनेक समस्या महिलांना भेडसावत आहेत .
महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी कमी करून त्यांच्यावर उपचार सेवा गतिमान करण्यासाठी ‘सशक्त नारी- सशक्त परिवार अभियान’ राबवले जाणार आहे. शनिवारी होणाऱ्या महिलांच्या विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात रक्तदाब, नेत्र, मधुमेह, दंत आरोग्य, स्तन व गर्भाशय मुकासह मुख कर्करोगाची तपासणी गरोदर महिलांसाठी प्रसुतीपूर्व तपासणी लसीकरण होणार आहे.
स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्राधान्य देणे, गरोदर व स्तनदा मातांसाठी योग्य आहार मासिक पाळी स्वच्छता व पोषण टेक होम राशनचे वितरण , आभा कार्ड काढणे अशा सेवा महिलांसाठी आरोग्य शिबिरात उपलब्ध करण्यात आले आहेत महिलांची काळजी घेतल्यास संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्यासाठी ती सक्षम असते त्यामुळे त्यागमूर्ती म्हणून गौरविली गेलेल्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याच्या काळजीसाठी या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका वृषाली राऊत यांनी केले आहे

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती