
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी
दिनांक 10/9/2025 रोजी रात्रीचे 12/20 वा सुमारास मौजे वेणेगांव शिवारातील वेणेगांव चौकातील जय मल्हार लोकनाटय कला केंद्राचे पाठीमागील बाजुचे गेटचे बाहेर फिर्यादीचा मित्र ज्ञानेष्वर बंदपट्टे हा त्याचा मित्र सुरज पवार यास आपण दोघात एकच बैठक लावु असे म्हणाला असता सुरज पवार यांने ज्ञानेश्वर बंदपट्टे यास तु काय आम्हास भुरटा समजतो काय ? असे म्हणुन सुरज पवार रा पंढरपूर व त्याचे सोबतचे तीन इसमांनी ज्ञानेश्वर बंदपट्टे यास मारहाण सुरू केली त्यावेळी फिर्यादी व त्यांचे मित्र वैभव ननवरे,
सचिन सांळुखे असे भांडण सोडवत असताना सुरज पवार यांचे सोबत असलेल्या एक इसमांने त्याचे कडील असलेल्या रिव्हालव्हरने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देषाने एक राऊंड फिर्यादीचे डावे बाजुचे मांडीवर फायर करून फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला वगैरेचा जबाब मार्स हॉस्पिटल येथे ऍडमिट असताना पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी जखमीचा जबाब घेऊन देवा बाळु कोठावळे वय 27 वर्श व्यवसाय लॉज रा.वाखरी ग्रामपंचायत जवळ, वाखरी ता. पंढरपुर जि. सोलापुर यांच्या फिर्यादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाणे भाग 5 गुरनं 591 / 2025 बीएनएस कलम 109,3 (5) शस्त्र अधिनिय 3,25,27 अंतर्गत आरोपी सुरज पवार रा.पंढरपुर व इतर तिघांवरती गुन्हा दाखल झाला आहे. तसेच गुन्ह्याचे घटनास्थळावरून रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे..
संबंधित गुन्ह्याच्या घटनास्थळास माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग यांनी भेट दिली असून गुन्ह्याच्या तपासकामी फॉरेन्सिक टीम बोलवण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के करीत आहेत. गुन्ह्यातील फरारी आरोपींच्या शोध कामी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप गिरमकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास नलवडे, पोलीस कॉन्स्टेबल मोहन तळेकर यांना रवाना केले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती