
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
लायन्स क्लब हा इंटरनॅशनल क्लब असून जगामधील एकूण २०२ देशांमध्ये कार्यरत आहे. लायन्स क्लबचे जगामध्ये एकुन ४९००० शाखा/क्लब व १४ लाख सभासद आहेत त्यापैकी, लायन्स क्लब ऑफ आटपाडी युनायटेड हा १ सामाजिक सेवाभावी क्लब असून त्याच्या आटपाडी तालूका अधक्ष पदी ॲड . धनंजय पाटील यांची निवड झाली त्यामुळे त्यांचा वरीष्ठ पदाधीकारी यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला.
लायन्स क्लब आटपाडी तर्फे गुरु हीच खरी प्रेरणा, शिक्षक हाच समाजाचा शिल्पकार या विश्वासाने कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ आटपाडी युनायटेड तर्फे यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपले आयुष्य वाहणाऱ्या गुरूंना योग्य तो मान मिळावा या हेतूने या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता.
गेल्या वर्षभरात शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात झळाळुन कार्य करणाऱ्या अचुक शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांमध्ये
१) श्री. बाळासाहेब गोंजारी, जि.प.प्राथमिक शाळा नं 1 दिघंची
२) श्री श्रीकांत कुंभार, जि.प.प्राथमिक शाळा साठेनगर आटपाडी
३) श्री सचिन नंदकुमार नामदास, जि.प.प्राथमिक शाळा साळसिंग मळा विठलापूर
४) श्री नितीन गोरख वाघमारे, जि.प.प्राथमिक शाळा कोकरे खोरा वाक्षेवाडी
५) श्री सुनील संभाजी गायकवाड, जि.प.प्राथमिक शाळा रेबाई मळा शेटफळे
६) सौ. साधना सुरेश चव्हाण, जि.प.प्राथमिक शाळा काळामळा आटपाडी
तसेच माध्यमिक शाळा गटातून
७) श्री जयसिंग आबासाहेब देशमख, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विदयालय दिघंची
८) श्री दादासो विठोबा मोटे, राजाराम बापू हायस्कूल आटपाडी
तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक मधून
९) प्राध्यापक सौ कल्पना दीपक पाटील, ग.दि.माडगुळकर हायस्कुल व वसंतदादा पाटील कॉलेज माडगुळे
तसेच उच्च माध्यमिक मधून
१०) प्राध्यापक प्रवीण भांबुरे, आबासाहेब खेबुडकर सायन्स कॉलेज आटपाडी
११) प्राचार्य डॉक्टर रामदास नाईकनवरे, आर्ट ॲन्ड सायन्स कॉलेज आटपाडी
यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्य हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीप्रतत्रक देऊन गौरवण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान शिक्षक दिनी ५ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आला.हा केवळ सन्मान नसून त्यांच्या कार्याची पावती आहे, शिक्षक हे समाजाचे दिशादर्शक आहेत. प्रत्येक यशस्वी नागरिकाच्या मागे एक शिक्षक असतो. असे मत ॲड धनंजय पाटील यांनी सदर कार्यक्रमाच्यावेळी मत व्यक्त केले.
समाज मनाला स्पर्श करणाऱ्या या उपक्रमासाठी क्लबचे वरिष्ठ अधिकारी सुनील सुतार, प्रबुद्धचंद्र झपके, नरेंद्र रोकडे, बाळासाहेब शिरकांडे, महिंद्र कदम, जयवंत काटवटे, रविंद्र बेलगळकर, किशोर कपाले, ॲड जमदगणी तसेच या कार्यक्रमास आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील, क्लबचे माजी अधक्ष इंजि.तानाजीराव निकम,उपाध्यक्ष डॉ. विनायक पवार, सचिव इंजि. उदयसिंह पाटील,खजिनदार डॉ.जीवन पाटील, नारायण कदम सर, डॉ. संतोष मिसाळ , ॲड. पवनकुमार पाटील, इंजि.सुशांत कदम, काका सावंत सर, अरुण डोंबे, लक्ष्मण शिरकांडे सर, शरद चव्हाण सर, डॉ. गजानन मोरे, मार्केट कमिटी संचालक ॲड. माणिक गाढवे, धैर्यशिल गाढवे, वैभव चोथे, अतुल जाधव, प्रा. दिपक पाटील ,पोपट बाड, प्रसाद जवळे, शिवाजी पाटील, डॉ. उमाकांत कदम, डॉ. विक्रांत पाटील, मुक्तेश्वर माडगूळकर, डॉ. वृषाली राऊत, इंजि. संतोष राऊत, डॉ. शरद हसबे, सुरेश जाधव शेठ, जीएसटी इनस्पेक्टर विनीत पाटील तसेच पंचक्रोशीतील अनेक शिक्षक व प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती