
प्रमोद डफळ
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
राहुरी
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाला राहुरी खुर्द येथे गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकाने आज दि. 26 जुलै रोजी शनिवारी सकाळी नगर मनमाड रोड वरती राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स ॲन्ड किराणा स्टोअर या दुकानावर छापा मारला.
त्यावेळी तेथे गुटख्यासह मावा बनवण्याची मशीन मिळून आली. त्यावेळी सुमारे 5.50 लाखाचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात गुटखा विक्री करणाऱ्यांचे व अवैध व्यवसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कारवाई मध्ये अवैधरित्या मावा बनवण्याची मशीन, सुपारी, विमल पान मसाला एक चार चाकी रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला असून पवण उर्फ पृथ्वीराज दगडुसिंग गिरासे (वय 28) रा. राहुरी खुर्द या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पवन उर्फ पृथ्वीराज दगडू सिंग गिरासे राहुरी असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहे, दिगंबर कारखिले, सुनील पवार, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, दिनेश मोरे, अजय साठे, अमोल कांबळे, दीपक जाधव आदी पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
तसेच राहुरी पोलीस स्टेशनचे गणेश वाघमारे प्रमोद ढाकणे सुरेश गायकवाड यांनाही पाचारण करण्यात आले पुढील कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती