शासन गुटखाबंदीच्या निर्णयाची प्रभावी अमंलबजावणी करणार का ?

तरुणाईला वाचवणार का सर्वसामान्यांचा सरकारला सवाल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

महाराष्ट्रात गुटख्याची विक्री व तस्करी करणाऱ्यावर शासन यापुढे मोका अंतर्गत कारवाई करणार असल्याचे अन्न व प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात घोषणा केली .पण याची संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे अमंलबजावणी होऊन व्यसनाधीन तरुणाई व इतर यावर चपराक बसेल का ,या निर्णयामुळे खरेतर तरुण पिढीतील ,शाळा ,कॉलेज मधील व्यसनाधीन मुलांच्या पालकांना खरेतर अतिशय आनंद झाला आहे. पण याची प्रभावीपणे अमंलबजावणी होणार का प्रश्न ते शासनाला विचारीत आहेत. याबाबत खरेतर शासन गुटखा विक्रेत्यावर कारवाई करते पण तो गुटखा कुठून येतो तो खरा गुन्हेगार आहे. सदरच्या गुटखा व्यापाऱ्यावर निश्चित कोणाचा वरदहस्त आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे असुन जोपर्यंत गुटख्याच्या मोठ्या प्रमाणावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनवर कारवाई होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात गुटखा विक्री बंद होणार नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यातुन मोठ्या प्रमाणावर गुटखा महाराष्ट्रात येतो असे व्यापाऱ्यामधुन बोलले जात आहे. खरेतर प्रचंड गुटखा खाणयाने तोंडाचा कॅन्सर तसेच इतर शारीरिक व्याधी मोठ्या प्रमाणावर जडतात या व्यसनामुळे अनेक कुटुंबातील तरुण पिढी ,शाळा ,कॉलेज मधील विद्यार्थी यांना अक्षरशः आपला जिव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात शहरी तसेच ग्रामीण भागात गुटख्याची खुलेआम मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे यावर कोणाचाच वचक नाही. खरेतर महाराष्ट्रचे अन्न व प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ यांनी घेतलेला हा महतकांक्षी निर्णयाची किती प्रभावीपणे अमंलबजावणी होते .याची साशंकता आहे . खरोखरच गुटखा विक्री व तस्करी करणाऱ्यावर सरकार मोका अंतर्गत कारवाई करणार का ,अशी कारवाई केली तर निश्चितपणे या धंदयावर चपराक बसेल. सध्या शासनाच्या गुटखाबंदीच्या निर्णयाची शहर व ग्रामीण भागात फक्त चर्चा सुरु आहे तोपर्यंतच विक्रेत्यांनी दुपटीने दरवाढ केली आहे. तर काहीजण म्हणतात गुटखाच मिळत नाही या नावाखाली प्रचंड दरवाढ केली आहे. याची महाराष्ट्रात प्रभावीपणे अमंलबजावणी झाली तर व्यसनाधीन झालेली तरुणाई निश्चित वाचेल.