
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व योग प्राणायाम ग्रुपचे जेष्ठ सदस्य महादेव कदम सर यांचे चिरंजीव विनायक महादेव कदम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
त्यांनी यापूर्वी सन 2023 मध्ये उत्तीर्ण होऊन विस्तार अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली आहे यावर्षी सन 2025 मध्ये नुकत्याच झालेल्या परीक्षेत सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग दोन मंत्रालय मुंबई व जी एस टी राज्यकर अधिकारी वर्ग दोन या पदासाठी त्यांची निवड झाली आहे.
त्याबद्दल पतंजली योग प्राणायाम ग्रुपच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पुढील केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या यूपीएससी परीक्षेसाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या श्री कदम यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता चौथी पर्यंत पिंपरी खुर्द येथे झाले आहे.
माध्यमिक शिक्षण मेडशिंगी तालुका सांगोला या ठिकाणी पूर्ण केले आहे व पुढील शिक्षण इंजीनियरिंग पदवी सिंहगड कॉलेज पुणे या ठिकाणी पूर्ण केले त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक राजकीय उद्योजक शैक्षणिक बँका पतसंस्था मित्रपरिवार अशा अनेक माध्यमातून त्यांच्यावर पिंपरी तसेच आटपाडी भागातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती