गोरगरिबांचे शिक्षण वाचवा म्हणून आमदार पडळकरांना शिक्षक समितीचे साकडे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

गोरगरीब, अपेक्षित ,वंचित ,शोषित घटकांचे ,वाड्या वस्तीवरील शाळेत शिकणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण ,15 मार्च 2024 चा शासन आदेश रद्द करून वाचवावे . व जुनाच १ ते५ वी साठी १ते ६० पटापर्यंत २ , ६१ ते ९० पटापर्यंत ३, ९१ ते १२० पटापर्यंत ४ शिक्षक पदे
तसेच ६ वी ७वी ८वी प्रत्येक वर्गासाठी १ विषयशिक्षक असणारे जुने धोरणच कायम करावे .असे आवाहन शिक्षक समिती सांगलीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देऊन साकडे घालण्यात आले .

या नवीन शासन आदेशानुसार राज्यातील सुमारे 25000 शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील ६वी ते ८वी पर्यंतचे वर्ग असणाऱ्या शेकडो प्राथमिक शाळा बंद पडणार आहेत . जर शाळेला कमी पटसंख्येच्या नावाखाली शिक्षकच दिला जाणार नसेल तर पालक त्या शाळेत मुले कशी पाठवणार? त्यामुळे कष्टकरी ,शेतकरी, गोरगरिबांच्यासाठी असणाऱ्या सरकारी शाळा बंद पडणार असल्याने तो शासन आदेश रद्द करावा .

सदर शासन आदेश शिक्षणाचे खाजगीकरण व खाजगी कंपन्यांना बळ देणारा असल्याने व गरीबांच्या शिक्षणावर गंडांतर आणणारा असल्याने रद्द करण्यासाठी शासनदरबारी गोरगरीब व सामान्यांसाठी लढणाऱ्या आमदार पडळकर साहेबांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले . यावेळी आमदार पडळकर यांनी नक्कीच सदर प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामविकासमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले .

विधानसभेत विविध घटकांचे प्रश्न अभ्यासपूर्ण मांडत असल्याबद्दल पडळकर साहेबांचा सत्कार करण्यात आला .यावेळी शिक्षक समिती जिल्हा नेते बाबासाहेब लाड, जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, शिक्षक बँक माजी चेअरमन यु .टी जाधव, रमेश पाटील, सतिश पाटील, जगन्नाथ कोळपे,

शिक्षक बँक संचालक सचिन खरमाटे,आटपाडी तालुकाध्यक्ष संजय कबीर, सरचिटणीस नानासो झुरे, इन्ताब इनामदार, विजय पवार, प्रविण बाड, अधिकराव खांडेकर, श्रीकांत कुंभार, हैबतराव पावणे, अंकुश गेजगे, सिध्दार्थ कटरे, बाबासाहेब शेख आदी उपस्थित होते .