पिलीव येथील तरुणांचा खुन

अज्ञाताविरुदध गुन्हा दाखल

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

पिलीव

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द वय २८ वर्ष हा १० मार्च रोजी रात्री ८.३० वा.ते ११ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पिलीव ते चांदापुरी रोडवर वनविभागाचे क्षेत्रामधुन मेटकरी मळयाकडे जाताना रोडलगत असलेल्या जमिनीमध्ये आकाश अंकुश खुर्द वय २८ यास कोणत्या तरी अज्ञात इसमानी अज्ञात कारणावरुन आकाश यास गंभीर मारहाण करुन त्याचे पाठीवर ,

दंडावर,मांडीवर व पोटावर व इतर ठिकाणी कसाने तरी मारहाण करुन पोळवुन त्यास गंभीर जखमी करुन त्यास पुर्णपणे विवस्त्र करुन त्याचा खुन करुन त्याचेकडील मोटारसायकल नंबर एम .एच.४५ ए ब्लु ५८२१ हिचेसह मुलगा आकाश यास विवस्त्र करुन मारुन टाकल्याची फिर्याद मयताची आई अनिता अंकुश खुर्द यांनी दिली आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास माळशिरस पोलीस उपअधिक्षक मडावी साहेब करीत आहेत.