
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जांभूळणी
जांभूळणी येथील पुरोगामी विचार प्रवाहातील सामाजिक कार्यकर्ते व बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांच्या मातोश्री सौ. कमल देवबा मासाळ यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
त्यांच्या निधनानंतर रक्षा विसर्जनाच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने रक्षाविसर्जनाला छेद देत पर्यावरण जनजागृतीचा अंगीकार करून व संपूर्ण जांभुळणी गावामध्ये हिरवाई नटविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे शिवराम मासाळ यांनी त्यांच्या मातोश्रींच्या या विधी वेळी पर्यावरण रक्षक अशा वड व पिंपळ या झाडांची लागवड करून हा विधी संपन्न केला.
जांभुळणी गावचे सरपंच असताना सौ.संगिता शिवराम मासाळ व भाई शिवराम मासाळ यांनी आपल्या कारकीर्दीत डोंगराळ माळरान असलेला जांभुळणीचा परिसर हिरवाईने नटवण्याचा ध्यास घेतलेला होता.
त्यांच्या कारकीर्दीत कृषीविषयक तसेच वृक्षारोपणाचे आणि जलसंधारणाचे प्रकल्प ग्राम स्तरावर कार्यान्वित केले होते. त्यातील काही प्रकल्पांची राज्यस्तरावर व विधिमंडळामध्ये चर्चाही झालेली होती. श्रमप्रतिष्ठा बाळगणाऱ्या तरुणांना उद्योगधंद्याची नवी वाट दाखवणारा व स्वाभिमानी तरुणांच्या हाताला काम देणारा बंधाऱ्यातील मत्स्यपालन प्रकल्प हा विधिमंडळात गाजलेला त्यापैकी एक प्रकल्प होता.
त्यांच्या पर्यावरणवादी विचारसरणीच्या अनुभवातून व नित्यनियमाच्या कार्यातून त्यांनी आपल्या मातोश्रींच्या रक्षा विसर्जनाच्या वेळी उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या साक्षीने पर्यावरणाची बीजे रुजवली.
पर्यावरणासह धार्मिक कार्यातही महत्त्वपूर्ण असलेल्या वडाच्या व पिंपळाच्या झाडांची लागवड करून रक्षा पाण्याच्या स्रोतात विसर्जित करून त्याचे प्रदूषण व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी त्यांनी त्याला बगल देऊन येथे लावल्या जाणाऱ्या झाडाच्या वाढीसाठी उपयोगात आणल्या.
त्यातून त्यांच्या धार्मिक विधीसह चिरंतर आठवणी जागृत होण्यासाठी हे वृक्ष भविष्यात साक्ष देत देतील व यातून एक आदर्शाचा नवा पांडा रुजवला जात आहे.
वडाच्या झाडांमुळे व पिंपळाच्या झाडांमुळे मिळणारा ऑक्सिजन व त्यामुळे होणारी हवेची शुद्धता, पर्यावरणाचा दर्जा, पशुपक्ष्यांना आसरा तसेच जमिनीमध्ये मुळांच्या मदतीने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता व मृदेची होणारी धूप थांबवण्यासाठी हा उपक्रम पर्यावरणवादी विचारसरणीतून महत्वपूर्ण ठरत आहे.
या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर,भाजपा नेत जयवंतराव सरगर, योगगुरु हैबतराव पावणे, प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मण खटके, प्रा. बालाजी वाघमोडे, रासपाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, करगणीचे नेते दत्तात्रय पाटील, सदाशिव सरक, दादा महाराज जानकर, बळीराजा फाउंडेशनचे उपाध्यक्ष मारुती देशमुख, शंकर कांबळे, संतोष कोळपे, मोहन पडळकर, मायाप्पा बरकडे, श्रीकांत गावडे, शौकत मुलानी,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती