शेतकरी हवालदिल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील उत्तरमांड नदीकाठी असलेल्या स्मशानभूमी लगतच्या विद्युत डीपीचा अवघ्या चोवीस तासापूर्वी बसवलेला ट्रान्सफॉर्मर अचानकपणे जळाला असून सदर विद्युत डीपीच्या सततच्या तांत्रिक घोटाळ्यांमुळे येथील शेतकरी अक्षरश: देशोधडीला लागायची वेळ आली असून हवालदिल झाले आहेत.दरम्यान,
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सदर विद्युत डीपीवरील ट्रांसफार्मर गत आठवड्यात अचानकपणे जळाला होता.त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. ट्रांसफार्मर जळाल्यानंतर मागणी केल्यापासून उपलब्ध होईपर्यंत जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटला. त्यामुळे खरीप हंगामातील गहू, ऊस आदि पिकांची लागवड खोळंबली होती. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी गहू टोकणी, ऊस लागण केली आहे.अशा शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नसल्यामुळे अडचणीत सापडले होते.
दरम्यान, बुधवार दिनांक ४ डिसेंबर रोजी उंब्रज महावितरणने ट्रांसफार्मर उपलब्ध करून बसवला खरा परंतु, शुक्रवारी सकाळीच बसवलेला ट्रान्सफॉर्मर परत जळाला. ट्रांसफार्मर जळताना मोठा आवाज झाल्याचे येथील शेतकरी सांगतात.त्यानुसार पाहणी केली असता सदर विद्युत डीपीच्या परिसरात ट्रांसफार्मर मधून निघणाऱ्या तेलाचा सडा पडला होता.सततच्या तांत्रिक घोटाळ्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले असून वारंवार वाढीव क्षमतेच्या डीपीची मागणी करूनही उंब्रज महावितरण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
त्यामुळे महावितरणने वारंवार होणाऱ्या वीज घोटाळ्यांचे नेमके कारण काय? याचा शोध घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे ही काळाची गरज आहे. कारण होणाऱ्या वीज घोटाळ्यांचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरती झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आता यावरती उंब्रज महावितरणची नेमकी भूमिका काय? हे येणारा काळच सांगेल.
शेतकरी देशोधडीला लागायची वेळ
सदर डीपी वरील होणाऱ्या सततच्या तांत्रिक घोटाळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागायची वेळ आली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती