अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार

तोष्णीवाल कॉलेज जवळील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सेनगाव

सेनगांव येथील तोष्णीवाल कॉलेज जवळ काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव चार चाकी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

सेनगाव येथील तोष्णीवाल कॉलेज जवळ काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रमेश किसन तपासे वय 42 वर्ष रा.चक्री ता. हदगाव जि.नांदेड येथील रहिवासी असून सेनगाव तालुक्यातील मौजे गणेशपुर ही सासरवाडी असल्यामुळे आपल्या दुचाकीवरून सासरवाडी गणेश पुरकडेजात असताना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव चार चाकी अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत गंभीर जखमी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या अपघाताची सेनगाव पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी सेनगाव पोलीस स्टेशनचे शहर बीडजमादार सुभाष चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम जाधव इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताचा पंचनामा करून सेनगांव ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले असून डॉक्टरांनी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर बिट अमलदार सुभाष चव्हाण हे करीत असून सदरील घडलेल्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास सेनगाव पोलिसात प्रक्रिया सुरू होती.