प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आदर्श ग्राम यमाजी पाटलाची वाडी गावचे सुपुत्र , गदिमा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे आदर्श शिक्षक व माजी प्राचार्य रघुनाथ बापू नागणे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. शैक्षणिक ,सामाजिक , राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारं दिलदार व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं.
त्यांच्या जाण्याने नागणे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खूप मोठा मित्रपरिवार असलेल्या नागणे सरांनी अनेक यशस्वी विद्यार्थी घडविले. तरुणांना खेळाची व व्यायामाची गोडी लावण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. स्वतः पैलवान असल्याने त्यांना पिळदार शरीरयष्टी लाभली होती. गावातील तरुणांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी कार्य केले.
एक शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. त्यांच्या अकस्मित जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी सौ.मंगल नागणे,लहान भाऊ डॉ.अरुण नागणे,मुलगा रोहन नागणे,मुली सौ.रोहिणी आण्णासाहेब बागल, व सौ.रेखा प्रशांत चव्हाण, बहिण गोदावरी चव्हाण,पुतणे डॉ.अर्थव आणि डॉ.आशिष नागणे असा मोठा परिवार आहे. नातेवाईकांचा मोठा गोतावळा त्यांनी आपल्या कौशल्याने जपला आहे. अंत्यसंस्कार गुरुवार २७ जून सायं ७.०० वा. होणार आहे व रक्षाविसर्जन शनिवार दि.२९ जून सकाळी ८.०० वा.य.पा.वाडी स्मशानभूमीत होणार आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती