


कविता सवाखंडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पुणे
दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव पुणे येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आला. या शिवजयंती महोत्सव सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा यामुळे शालेय परिसर शिवमय होऊन गेला. सदर शिवजयंती महोत्सवामध्ये शाळेचे मुख्याध्यापक जॉर्ज पी.एस. सर, शाळेच्या कोऑर्डिनेटर विरेंद्र बर्मोटा मॅडम तसेच रीमा निकम मॅडम यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
या शिवजयंती महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सादर केलेल्या बहारदार अशा महाराष्ट्र गीताने झाली. तसेच शाळेतील शिक्षक जनार्दन खंडाळकर सर यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन गौरवावरील सादर केलेल्या पोवाड्यास विशेष दाद मिळाली ज्यामुळे शिवजयंती महोत्सवास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य केले.
तसेच याप्रसंगी शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच माता जिजाऊ यांच्या विषयी आपल्या जोशपूर्ण शैलीमध्ये बहारदार असे मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याप्रसंगी प्रवीण कमले सर तसेच तृप्ती जाणे मॅडम यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी आपले विचार मांडले. इयत्ता 9 वी च्या विदयार्थिनींनी अत्यंत सुंदर असे मावळा नृत्य सादर केले.
शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिवजयंती विषयी आणि शिवाजी महाराजांच्या विषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ.कविता सवाखंडे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमास शिक्षक तसेच शिक्षक तर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती