माळशिरस,प्रतिनिधी/ संजय हुलगे :
माळशिरस नगरपंचायत माळशिरसच्यावतीने श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस याठिकाणी सामाजिक नियमांचे पालन करीत १५१ कोरोना योध्दांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. संचालक निलेश घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.माळशिरस शहराच्या नगराध्यक्षा द्रौपदीबाई देशमुख व मा.उपनगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या सौजन्याने माळशिरस शहरातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, महसुल विभाग, व नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अशा १५१ जणांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. श्रीनाथ विद्यालयाचे संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांना डॉक्टरेट पदवी प्रदान समारंभ आणि दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले असून अशा महामारीमध्ये कोणत्याही प्रकारची मनात भिती न बाळगता आपले कर्तव्य म्हणून समाजामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे कोरोना योध्दा म्हणून शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पो.उपनिरीक्षक शशिकांत शेळके, ए.एम.बकाल, प्रणय शिंदे, राहुल झुंझुर्डे, जी .पी. गायकवाड , सरकल मल्लिनाथ लाकडे , तलाठी सचिन पाटील ,डॉ.राहुल गावडे, विकास पवार, डॉ .रायबोले, डॉ .नडे, दळवी , शेख , पांडवले , सुरज खताळ , नगरसेवक अशोक वाघमोडे, महेश बोत्रे, महादेव माने, गौरव गांधी, विजय देशमुख, रावसाहेब देशमुख, धनाजी देवकर उपस्थित होते.कार्ययक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस पाटील औदुबंर बुधावले यानी केले. आभार प्राचार्य योगेश गुजरे यांनी मानले .


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती