
अध्यक्ष बळीराजा फौंडेशन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
मराठा आणी धनगर जमातीच्या सहा युवकांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आत्महत्या करून जर प्रश्न मिटणार असेल तर आपण सामूहिक आत्महत्या करूयात का?
आज आरक्षणाचा प्रश्न जटील होत चालला आहे, त्यासाठी आपण वैचारिक लढाई लढली पाहीजे, शासनास जागे करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतोय,परंतू मराठा समाजाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील शांततेत लढताना दिसतात, लाखोंच्या गर्दीला शांत राहण्याचे आवाहन करतात,जरांगेंनी कपटनितीने होणारे डाव ओळखलेत, त्यांना माहित आहे अंदोलनास गालबोट लागले तर सर्वात जास्त बदनामी आपली करण्यात येईल, गालबोट लागून गोंधळ झाल्यास लढवय्ये तरूण, निष्पाप लोंकाचे बळी देखील जातील ह्याची भिती जरांगेंना आहे, जर समाज नसेल अंदोलन करून फायदा काय? हाचं पेच पुणे कराराच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देखील पडला होता तेंव्हा त्यांना समाजापेक्षा अंदोलन महत्त्वाचे नाही, म्हणून त्यांना अंदोलन मागे घ्यावे लागले होते, अंदोलन शांततेत सूरू असताना इतक्या तरूणांनी आत्महत्या करून काय साध्य केले, उलटपक्षी प्रामाणिक अंदोलन करणार्या नेतृत्वाचे खच्चीकरण होत आहे,माझ्या मते आत्महत्या करणारांचा हेतू शासनाला भिती दाखवण्याचा असू शकेल परंतू आत्महत्या करणारेच ह्या अंदोलनाचे विरोधक आहेत का? मराठा आणी धनगर दोन्हीं जाती,जमाती लढवय्या आसताना हा पळपुटेपणा कशासाठी? ह्यांची काळजी सकल मराठा व धनगर जातीने समाजाने घ्यावी , प्रामाणिक नेतृत्व शेकडो वर्षे खर्ची गेली तरी मिळत नाही, आज मनोज जरांगेंच्या माध्यमातून काहीअंशी अशा निर्माण झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी फुलांब्री तालूक्यातील सरपंच मंगेश साबळे याने देशविघटक गुणरत्न सदावर्तेच्या मुंबईतील घरासमोरील गाड्या फोडून स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवली असली तरी ते बिलकूल योग्य नाही, ह्यातून हिंसाचार होऊन अनेक मराठा तरूणांच्यावर गुन्हें नोंद केले जातील आणी याचे सर्व खापर मनोज जरांगे पाटील यांच्यावर फोडले जाईल. आणी हेचं कारण मराठा अंदोलनात फूट पडण्यास कारणीभूत ठरेल जे सरकारला अपेक्षित आहे तेच काम सरपंच साबळे पोरकटपणाने किंवा कोण्याच्या तरी सांगण्यावरून करताना करताना दिसतात अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.
धनगर जमात आंदोलनाची जशी अनेक शक्कले झाली आहेत, त्यामुळे अंदोलनातली हवा निघून जाताना दिसत आहे, तीचं अवस्था मराठा समाज अंदोलनात करण्याचा डाव कोण तरी करतोय हे लक्षात घेतले पाहिजे, आता मराठा, आंदोलकांनी आपल्यातील फूटी ऐवजी एकजूटीवर लक्ष केंद्रित करून मनोज जरांगे – पाटील यांच्यावर विश्वास ठेऊन ते सांगतील तसे अंदोलन उभे केले पाहिजे. आणी तुम्हीं कोणी आत्महत्या करत असाल किंवा साबळे सारखी स्टंटबाजी करणार असाल तर अंतीम टप्यात आलेली लढाई मनोज जरांगे पाटील यांना नाईलाजाने थांबवावी लागेल आणी यांस आत्महत्या करणारा युवक व साबळे सारखे स्टंटबाजी करणारे जबाबदार राहतील आज पर्यंत केलेले सर्व कष्ट वाया जाईल.
धनगर जमात आंदोलन यशस्वी करायचे असेल तर एकजूट प्रचंड महत्वाची आहे, कारण मागील लोकसभा निवडणुकीत धनगरांना केंद्रबिंदू ठेऊन काम करणारा पक्ष त्यांना अपेक्षीत असणारा धनगर जामातीने प्रतिसाद दिला नसल्याने,
कालांतराने मराठा समाजास कुरवाळत होता, परंतू मराठा समाजाची मानसिकता काहीं काळ तपासली मराठा टेकून घेत नाही हे लक्षात आल्यावर आता त्यांनी आदिवासी समाजाकडे आपला मोर्चा वळविला आहे,ही बाब गांभीर्याने घ्यावी लागेल,धनगर जमात आणी अदिवासी जमात यांच्यात तेल ओतायचे काम राज्यातील दोन पक्ष उघडपणे करतात तर दोन राष्ट्रीयपक्ष छूप्या पद्धतीने करतात,
धनगर आणी अदिवासी व मराठा आणी ओबीसी यांच्यात वाद लावून इंग्रजाप्रमाणे तोडोफोडो नितीचा अवलंब होतोय ह्याची समज चारही घटकांना असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात अशांतता पसरविणे हेचं सुत्र अवलंबून राज्य लुटायचे आहे.
कोणत्याही पक्षाचा व संघटनेचा पाया हा एखादी जात आणी धर्म असेल तर एकात्मतेला तडा गेल्या शिवाय राहत नाही.
परंतू भारतातील सगळेच पक्ष (कम्युनिस्ट व शेतकरी कामगार पक्ष अपवाद) जाती धर्माचा आधार घेतल्या शिवाय उभे राहिलेले नाहीत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती