ग्रीन पॉवर शुगर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कडेगांव

ग्रीन पॉवर शुगर्स गोपूज कारखान्याचा १० वा गळीत हंगाम २०२३-२४ चा बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते तर बॉयलर होम हवन पूजा ज्येष्ट कार्यकर्ते धोंडीराम मोहीते व त्यांच्या सुविध्य पत्नी शोभा मोहीते यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी टेंभू योजनेचे शिल्पकार स्व. संपतराव आण्णा देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कारखान्यांचे संचालक चंद्रकांत पाटील, अशोक मुळीक, गोपूजच्या माजी सरपंच शहाजान मुलाणी, जयवंत घार्ग्रे, चंद्रकांत घार्घे जनरल मॅनेजर हणमतराव जाधव, प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव, शेती अधिकारी आर.के.पवार, चिफ इंजिनिअर शहाजी भोसले, चिफ केमिस्ट विठल ठोंबरे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख म्हणाले की कारखान्याकडे अपेक्षेप्रमाणे ऊस नोंद झाली असून ऊस तोडणीचे नियोजन झालेले आहे. तोडणी साठी ५०० टॅक्टर गाडी, ५० ट्रक, १५० टॅक्टर, १५०, बैल गाडी, ८ हार्वेस्टिंग मशीन सज्ज ठेवल्या आहेत. यावर्षीचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालवणार असून त्या दृष्टीने सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे. त्यामुळेच सर्व शेतकऱ्यांच्या उसाला योग्य तर देण्यासाठी ग्रीन पॉवर शुगर्स कटिबद्ध असल्याचे देशमुख यांनी सांगीतले.
यावेळी उस्मान मुजावर, महेश घार्घे, श्रीरंग घार्गे, दत्तात्रय घार्गे ,विनायक खराडे, नितीन घार्गे, रशीद शेख, बाबा घार्गे, तानाजी घार्गे, पांडुरंग घार्गे, नितीन घार्गे, संतोष मांडवे, शिवाजी कणसे यांच्या सह कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, सर्व खाते प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.